top of page
Writer's picturechavannilam695

मूल गर्भामध्ये संवाद साधते ऐकायला शिका!!


Parenting and garbhsanskar


तृतीये मासी सर्वेन्द्रियाणि सर्वाङ्गावयवाश्च यौगपद्ये नाभिनिर्वर्तन्ते ||च.शा4/11


आयुर्वेदिय ग्रंथ चरक संहिता यामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाचे सर्व अवयव सर्व इंद्रिय व्यक्त होत असतात असे सांगितले आहे. त्यामुळे सर्व इंद्रिय सूक्ष्मतः काम करण्यास सुरुवात झालेली असते म्हणजेच बाळाचे श्रवणेंद्रिय सुद्धा त्याचं काम सुरू करते.


मूल गर्भामध्ये असतानाच त्याला ऐकू येण्याची क्षमता असते ,ऐकू येण्याची प्रक्रिया मुख्यतः कानाशी संबंधित असते म्हणजेच कान पूर्ण विकसित झाल्यानंतरच खरंतर बाळाला ऐकू यायला पाहिजे मात्र बाळ सोळाव्या आठवड्यातच आवाजाला प्रतिसाद देऊ लागते यालाच रिॲक्टिव्ह लिसनिंग असे म्हणतात याचा अर्थ जाणिवेची प्रक्रिया काही अजबच आहे.

याबाबत फ्रेंच शास्त्रज्ञ अल्फ्रेड टोमाटिस यांनी बरेच संशोधन केले आणि त्यांच्या लक्षात आले कानामधील आवाज शोषणाऱ्या पेशी ज्यांना कोर्टी पेशी (corti cells)असे म्हणतात त्या पूर्ण शरीरा वर त्वचेवर पसरलेल्या असतात म्हणजे त्वचा हे एक संपूर्ण कान म्हणूनच काम करत असते. त्याचप्रमाणे शरीराच्या हाडामधून सुद्धा आवाजाचे शोषण आणि वहन होते म्हणूनच जन्माच्या पूर्वी कान तयार झाला नसला तरी संपूर्ण शरीर आवाज ऐकण्याचे काम करत असते. गर्भ हा गर्भजलाने घेरलेला असतो ध्वनि हा हवेपेक्षा पाण्यातून चार पट अधिक वेगाने जात असल्याने गर्भजलात बुडलेल्या गर्भाला सुद्धा ध्वनी ऐकू येतो.गर्भामधील बाळाला कोणते संगीत ऐकायला आवडते यावर अनेक संशोधने झाली आहेत. प्रत्येक बाळाचा रडण्याचा आवाज हे त्याच्या आवाजाचे एक ओळखपत्र असते याबद्दलचे संशोधन करताना असे लक्षात आले की गर्भातील मुल हे केवळ ऐकत नाही तर ऐकून त्याप्रमाणे हालचाल करते म्हणजेच मूल गर्भामध्ये असतानाच भाषेचे धडे गिरवते म्हणजेच त्याची भाषिक बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते, बराच वेळा आपण पाहतो मुल हे आपल्या आईचा आवाज ओळखते पण केवळ जन्मानंतरच नव्हे तर जन्मा अगोदर गर्भावस्थेमध्ये सुद्धा ते आईचा आवाज ओळखू शकते आणि त्याला प्रतिसाद देऊ शकते अशी अनेक संशोधने झाली आहेत याचाच अर्थ मूल गर्भामध्ये असताना शिकत असते.

गर्भ संगीत ऐकल्यामुळे व्हर्बल मेमरी मध्ये वाढ होते ज्यामुळे डाव्या मेंदूतील टेम्पोरल लोब उद्दीपित होतो, यामुळे गर्भसंगीत हे एक बाळाला शिकवण्याचे छान माध्यम आहे

आता प्रश्न येतो की बाळाशी संवाद साधायचा कसा तर बाळ म्हणजे एक व्यक्ती आहे अशा प्रकारेच आपण त्याच्याशी संवाद साधायला हवा. अगदी तुम्ही तुमचं डेली रुटीन घरामध्ये घडलेले चांगले प्रसंग सण उत्सव बाहेर फिरायला गेल्यानंतर जर तुम्हाला काही आवडलं असेल तर त्याचं वर्णन आपण करू शकतो आणि ते बाळाला सांगू शकतो , तसेच वेगवेगळी पुस्तक आपण मोठ्याने बाळाला वाचून दाखवू शकतो जसे की गोष्टीची पुस्तके असतील काही गाणी असतील जे आपल्या आवाजामध्ये आपण बाळाला ऐकू शकतो . याच बरोबर आमच्याकडे गर्वसंवाद साधण्याचे एक वेगळी पद्धत आहे ती सुद्धा आम्ही गर्भसंस्कार वर्गांमध्ये तुम्हाला शिकवत असतो.

गर्भसंवाद केल्यामुळे नक्की काय काय फायदे होतात.

१) भाषिक कौशल्य वाढते


२) आपण गर्भसंवाद करत असताना बाळाशी प्रेम व्यक्त करतो आणि त्यामुळे ऑक्सिटोसिन हार्मोन(oxytocin harmone) जे की लव हार्मोन(love harmone) असं म्हटलं जातं ते सुद्धा सवले जातं आणि ते हार्मोन आपल्या रक्तामार्फत बाळापर्यंत पोहोचत असतं ज्यामुळे बाळही खूप आनंदी होतं.


3) बाळाला खूप सुरक्षित वाटू लागतात.


4) बाळाचा कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास वाढीस लागतो.

88 views0 comments

Comments


bottom of page